पुण्यात निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेणार – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे:: पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीनं पोहोचणं महत्त्वाचं असल्यानं त्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न केले जाणार असल्याचंही महापौर म्हणालेत.पुण्यात कोरोनाचा मोठा विस्फोट होताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. नुकतीच पुणे महापालिकेची कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सूचक विधान केल

दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित होताना दिसत असल्याचं समोर आले आहे. 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसात पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ दिवसात पुण्यात अॅक्टिव्ह रुग्ण संख्या चौपट झाल्याचंही समजतंय. नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जातं असून 80 टक्के लोक दोन्ही डोस घेतलेली बाधित होताना दिसत असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितलं आहे.

या बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.गेल्या 8 दिवसात वाढलेल्या रुग्ण संख्येचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं असून महापालिका त्या अर्थानं सुसज्ज असल्याचंही महापौर मोहोळ यांनी म्हटलं आहे. जम्बोचे स्ट्रक्चरल ॲाडिट केले आहे. 24 तासात मशिनरी सुरु होईल याचे नियोजन केलं असून गरज भासल्यास सुरु होणार, असंही ते म्हणालेत. तसंच 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर 340 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती महापौरांनी कोरोना आढावा बैठकीत दिली

.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी दिवसभरात 50 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये पुणे ग्रामीण येथील 2, पिंपरी चिंचवड येथील 8 तर पुणे मनपा हद्दीतील तब्बल 36 रुग्णांचा समावेश आहे. तर सांगलीतील 2, मुंबई आणि ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा आकडा 510 वर पोहोचला आहे.

Latest News