कठोर परिश्रम, संयम, समर्पण आणि सातत्य असेल तर यश नक्की…..माधव हुंडेकर


कठोर परिश्रम, संयम, समर्पण आणि सातत्य असेल तर यश नक्की…..माधव हुंडेकर
एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनचे पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) वास्तुविशारदाच्या अंगी कठोर परिश्रम, संयम, समर्पण आणि कामात सातत्य असेल तर नक्कीच यश मिळेल. वास्तूविशारदाने सर्जनशीलता, संघटन कौशल्य आणि संयुक्त कार्यपद्धती या त्रिसुत्रीचा उपयोग करुन आपल्या उद्योग, व्यवसायाची पायाभरणी करावी असे मार्गदर्शन वास्तूविशारद माधव हुंडेकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी वास्तूविशारद वासवी मुळ्ये, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अरुण अत्रे, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, पीसीईटीच्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि शैक्षणिक समन्वयक डॉ. जान्हवी इनामदार, नॅकचे समन्वयक प्रा. शिरीष मोरे तसेच प्रा. शिल्पा पाटील आदी उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या इंडक्शन कार्यक्रमात पालक, विद्यार्थी, प्राचार्य आणि सर्व प्राध्यापकांशी संवाद कार्यक्रम झाला. यावेळी वास्तूविशारद माधव हुंडेकर म्हणाले की, जीवनात येणा-या अपयशाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिल्यास भविष्यातील यशाची पायाभरणी होईल. प्रत्येक यशस्वी उद्योग, व्यवसायासाठी माहिती, ज्ञान आणि अनुभव हि गुरुकिल्ली असते. आर्किटेक्चर हा एक उत्कृष्ट व्यवसाय असून या क्षेत्रात महिलांना देखील उत्तम संधी आहेत.
पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे. उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.