महापालिकेस सुरक्षारक्षकांची सेवा कोणत्याही एजन्सी कडुन घेण्यास प्रतिबंध: कामगार आयुक्त
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व सुरक्षा अधिकारी यांना सहाय्यक कामगार आयुक्त पुणे तथा अध्यक्ष पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांनी मंडळाचे सुरक्षारक्षक घेण्याच्या दिल्या सूचना लोक जनशक्ती चे महाराष्ट्र सचिव प्रशांत खंडाळे व संघटना अध्यक्ष महेंद्र गरुड यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापना हि पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात मुख्य मालक म्हणून नोंदीत आहे लोक जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र सचिव श्री प्रशांत खंडाळे व सुरक्षारक्षक कामगार युनियनचे अध्यक्ष श्री महेंद्र गरुड यांनी मंडळाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती तक्रारीत महानगरपालिकेच्या आस्थापनेत खाजगी एजन्सीकडून बेकायदेशीर सुरक्षारक्षक व्यवसाय सुरू आहे
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 योजना 2002 व 2005 ची अंमलबजावणी पुणे जिल्ह्यात दिनांक 5 डिसेंबर 2002 पासून शासनाच्या अधिसूचना करण्यात आली होती याकरिता जिल्ह्यात मंडळाची स्थापना करण्यात आल्यापासून कोणत्याही आस्थापना व महापालिकेस सुरक्षारक्षकांची सेवा कोणत्याही एजन्सी किंवा कंत्राटदार यांच्याकडून घेण्यास प्रतिबंध करण्यात आला होता
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात नोंदीत आहे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम व उद्योग ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय यांनी दिनांक 8 नोव्हेंबर 2006 चे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेला लागू असून त्यानुसार सुरक्षारक्षकांची सेवा महाराष्ट्र शासन स्थापित पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा मार्फत घेणे अनिवार्य करून खाजगी सुरक्षा सेवा ठेकेदारांकडून अभीकरणा कडून घेण्यास प्रतिबंध केला होता परंतु पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अधिनियम व योजनेच्या अंतर्गत असलेल्या विविध कलमाचा व तरतुदीचा अवमान करत दिनांक 8 नोव्हेंबर 2006 व मा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे ही बाब आम्ही वेळोवेळी महापालिकेचे सुरक्षा अधिकारी यांच्या निदर्शनास आणली असून सुरक्षा अधिकारी या अधिनियम व योजनेची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे या संदर्भात लोकजनशक्ती पार्टीने व भारतीय सुरक्षा रक्षक कामगार युनियन यांनी पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कडे तक्रार केली होती
पिंपरी-चिंचवड महापालिकेत एजन्सीमार्फत सुरक्षारक्षक तैनात केल्याचे मंडळात दिसून आल्यामुळे दि. 31 डिसेंबर 2021 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त तथा पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांनी पालिका आयुक्त व सुरक्षा अधिकारी यांना खाजगी सुरक्षा एजन्सीचे सुरक्षारक्षक काढून मंडळाचे सुरक्षारक्षक घेण्याचे सूचना दिल्या आहेत अन्यथा संबंधित अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे