रिक्षा चालकाने भाडे नाकारल्यास, रिक्षा कायदयानुसार सेक्शन 68 नुसार करवाई

पुणे:: प्रवाश्यांना अश्याप्रकारे रिक्षा चालकाने भाडे नाकारल्यास त्यांनी स्वतः पुढे येत तक्रार केली पाहिजे यासाठी आरटीओच्या संकेत स्थळावर जात ही तक्रार प्रवाश्याना नोंदवता येणार आहे. याबरोबरच आरटीओ कार्यालयात जात लेखी स्वरूपातहीतक्रार नोंदवता येणार आहे.अनेकदा प्रवास करताना जवळचे भाडे असेल तर रिक्षा चालक नकार देत निघून जातात. जवळचे भाडे परवडत नसल्याचे सांगत थेट नाही म्हणतात. अश्या प्रकारे गैरसोय झाल्याचा अनेकांना अनुभव आला आहे.
मात्र अश्या प्रकारे रिक्षावाल्यांनी प्रवास नाकारल्यास त्या रिक्षा चालकाची थेट मोटार वाहन कायद्यानुसार तक्रार करत येते.मात्र यासाठी त्या प्रवाश्याला रिक्षा चालकाची तक्रार द्यावी लागणार आहे. या प्रकारची तक्रार दिल्यानंतर आरटीओ प्रशासन रिक्षा चालकाचा परवाना व परमिट निलंबित करू शकतात. रिक्षा चालकावर मोटार वाहन कायदयानुसार सेक्शन ८६ नुसार करवाई होऊ शकते