जेष्ठ नागरिक महासंघ घेणार नवीन लागवड केलेल्या रोपांची काळजी.

c6e46837-acf8-4566-bd5e-e40805a1fa86

महानगरपालिकेने शहरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. शहरातील नवीन लागवड केलेल्या रोपांची जबाबदारी आता जेष्ठ नागरिकांनी उचलली आहे.
उद्याच्या पिढीसाठी जेष्ठ नागरिकामधील वटवृक्ष सरसावला आहे. लवकरच उन्हाळा येतोय, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लहानग्या रोपांना पाणी घालण्याचे आवाहन स्वीकारले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अंघोळीची गोळी आणि खिळेमुक्त झाडं टीम तसेच शहरातील सर्व सामाजिक संस्था यात सहकार्य करत आहेत.
प्रधिकरणमधुल संभाजी चौकात नवीन लावलेल्या झाडांभोवती प्लॅस्टिक बाटल्या बांधल्या गेल्या. यावेळी ७५ रोपांना पाण्याच्या बाटल्या लावण्यात आल्या. त्यात जेष्ठ नागरिक रोज पाणी घालणार आहेत. त्यांनी आवाहन केले की कामाला, कॉलेज मध्ये जाता येता या रिकाम्या बाटल्यात पाणी ओतावे. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी वृषाली मरळ, अरुण बागडे, सूर्यकांत मुथीयान, राजीव भावसार, ननावरे ,संदीप सपकाळ, सिकंदर घोडके तसेच वृक्ष प्राधिकरणाचे हिरामण भुजबळ उपस्थित होते.
महानगरपालिकेचे उपयुक्त सुभाष इंगळे यांनी जेष्ठ नागरिकांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अंघोळीची गोळीचे समन्वयक राहुल धनवे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

Latest News