26 डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जाणार – पंतप्रधान नरेंद्र मोदीं

नवीदिल्ली : “गुरू गोविंद सिंह यांची जयंती प्रकाश पर्वानिमित्त मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आता भारत दर वर्षी २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’  साजरा करेल. गोविंद सिंगांच्या चार साहिबजाद्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोविंद सिंगजी यांची जयंती अर्थात ‘गुरू पर्वा’निमित्त मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जाणार आहे.

गुरू गोविंद सिंगजी यांच्या चार पुत्रांना श्रद्धांजली म्हणून पंतप्रधानांच्या या निर्यणाकडे पाहिलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी प्रकाश पर्वानिमित्त दहावे शीख गुरू गोविंद सिंगजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान म्हणाले की, “गुरू गोविंद सिंगजी यांचे जीवन आणि संदेश लाखो लोकांना शक्ती देते. एवढंच नाही तर गुरू गोविंद सिंग यांची ३५० वी जंयती साजरी करण्याची संधी आपल्या सरकारला मिळाली, याचा मला नेहमीच आनंद वाटत राहील.

Latest News