पिंपरी महापालिका आकर्षक व मजबूत जाहिरात फलक स्वत: उभारणार,एप्रिल मध्ये होर्डिंग्ज उभा करण्याचे नियोजन, आयुक्त राजेश पाटील यांची दृढ इच्छाशक्ती,अचूक, धाडशी निर्णय

महापालिका स्वत:चे जागेत आकर्षक व मजबूत असे जाहिरात फलक स्वत: उभारुन त्याची ई-निविदा प्रसिध्द करणार

पिंपरी: महापालिकेचे उत्पन्न वाढविणेकामी महापालिका स्वत:चे जागेत आकर्षक असे मजबूत जाहिरात फलक स्वत: उभारुन त्याचे हक्क ई-निविदा प्रक्रीया राबवून देणार आहे. अशाने शहराचा बकालपणा कमी होऊन शहर सौंदर्यात वाढ होणार आहे. त्यामुळे जाहिरातदारांनाही संधी मिळणार असून मनपाचे उत्पन्न वाढीबरोबरच जाहिरातदारांनाही त्याचा जादा लाभ मिळणार आहे. स्वताची एप्रिल मध्ये होर्डिंग्ज उभा करण्याचे नियोजन दृढ इच्छाशक्ती, धाडशी निर्णय आणि अचूक नियोजन केले आहे

३९ निविदाची प्रक्रीया ३ वर्षापासून सुरु आहे. त्यामध्ये निविदाधारकांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले असलेचे दिसून येते. त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान झालेले आहे. सध्या महापालिकेचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेला आहे. शहरातील नागरिकांसाठी रस्ता सुरक्षा व शहराचे सौंदर्यवृध्दी यासाठी महानगरपालिकेने नविन जाहिरात धोरण तयार केलेले आहे दृष्टी विधान “ बाह्य जाहिरातींच्या माहिती प्रवाहाचे नियमन करुन शहराच्या दृश्य सौंदर्यात भर घालणे “ जाहिरात धोरण शहरातील नागरिकांसाठी उपयुक्त असणार आहे

.महापालिकेने जे नविन जाहिरात धोरण तयार केलेले आहे त्याचेशी विसंगत असे जाहिरात फलक उभारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या निविदा रद्द करण्याचा आदेश आयुक्त राजेश पाटील यानी दिले आहेत

   पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत महानगरपालिकेच्या जागेत जाहिरात फलक उभारणीचे हक्क देणेकामीची ई-निविदा सुचना क्रमांक ४/१ते१८५/२०१८-१९ अवये निविदा दर मागविणेत आले होते. याकामी एकुण १८५ निविदापैंकी ८२ निविदा ठेकेदारांचा प्रतिसाद नाही, कमी दर या कारणास्तव रद्द करन्यात आलेल्या आहेत.

महापालिका स्वत:चे जागेत आकर्षक व मजबूत असे जाहिरात फलक स्वत: उभारुन त्याची ई-निविदा प्रसिध्द करणार आहे. भविष्यामध्ये प्रसिध्द होणारी निविदा सध्याचे महत्तम निविदाधारक यांनाही उपलब्ध असणार आहे.

Latest News