स्पाइन रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या तात्काळ सोडवा : स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव


स्पाइन रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या तात्काळ सोडवा : स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव
– पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
स्पाइन रस्त्यावर चिखली अंडरपासजवळ रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना होत असलेल्या गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील स्पाइन रस्त्यावर चिखलीजवळ अंडरपासच्या पुढे भिंती उभारण्यात आली आहे. या भिंतीवरून रस्त्यावर पाणी वाहते आहे. या वाहत्या पाण्यामुळे दुचाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना उगाचच सहन करावा लागत आहे.
प्राधिकरणातील स्पाइन रस्त्यावर चिखलीजवळ अंडरपासच्या पुढे थोडे भिंतीवरून पाणी सतत वाहत असते. त्यामुळे वाहनचालक येथे घसरून अपघात होत असतात. महापालिका प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी वारंवार येथील नागरिक करत असताना पालिका डोळेझाक करीत आहे. अंडरपास पुढे असलेल्या भिंतीवरून कशामुळे पाणी वाहत आहे. याची तातडीने पाहणी करून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणीही स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली