घरेलू कामगारांसाठी जनता वसाहत मध्ये श्रमसाफल्य महिला कामगार कल्याण संस्थेची स्थापना. ॲड योगेश आढाव


घरेलू कामगारांसाठी जनता वसाहत मध्ये श्रमसाफल्य महिला कामगार कल्याण संस्थेची स्थापना
आज जनता वसाहत परिसरातील ७०% महिला आजूबाजूच्या परिसरामध्ये घरेलू कामे करतात, परंतु या घरेलू काम करणाऱ्या आपल्या महिलांसाठी आज पर्यंत केंद्रसरकारने, राज्यसरकारने व कोणत्याही सामाजिक संस्थेने आपल्या घरेलू कामगारां च्या हक्कासाठी, संवर्धनासाठी, न्यायासाठी शाश्वत पावले किंवा योजना आखल्या नाहीत. आपल्या घरेलू कामगारां केवळ एक कामगार म्हणून ओळखले जाते, परंतु या कामगारांच्या अनुषंगाने मिळणाऱ्या सरकारी योजना देखील घरेलू कामगारां पर्यंत पोहचविण्यात सरकार, लोकप्रतिनिधी, लोकसेवक व जनसेवक हे देखील अपयशी ठरली आहेत. या लोकांनी केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी अथवा त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी आपल्या महिलांची दिशा भूल करून फॉर्म भरून घेणे व ते तसेच निरुपयोगी अवस्थेत ठेवणे या पलीकडे दुसरं काही केलेलं नाही
संस्थेमार्फत घरकाम करणाऱ्या महिलांना हक्काच व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्याच बरोबर शासकीय योजनांचाही लाभ घेता येईल. त्यामध्ये महिलांना संस्थेमार्फत ओळखपत्र / वित्तीय पाठबळ / पगार पावती / भविष्यनिर्वाह निधी / विमा / प्रसूती खर्चास अनुदान / सॅनिटरी पॅड / मोफत कौटुंबिक खटले व कायदेशीर मार्गदर्शन संस्थेचे संचालक ॲड योगेशदादा आढाव यांच्या तर्फे या सुविधा देण्यात येतील. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, मनसे नेते अनिल शिदोरे सर, शहराध्यक्ष वसंत मोरे, बाळासाहेब शेडगे यांच्या उपस्थितीत पार पडला.घरेलू कामगारांसाठी जनता वसाहत मध्ये श्रमसाफल्य महिला कामगार कल्याण संस्थेची स्थापना