मनसेच्या प्रदीप गायकवाड यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश


मनसेच्या प्रदीप गायकवाड यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
गायकवाड यांच्या राष्ट्रवादी प्रवेशमागे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची महत्त्वपूर्ण भूमिका
पिंपरी, प्रतिनिधी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी सांगवी-पिंपळे गुरव प्रभाग अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, विद्यमान नगरसेविका चंदाताई लोखंडे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार उपस्थित होते.
गायकवाड यांच्या राष्ट्रवादी प्रवेशमागे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या पक्षप्रवेशामुळे पिंपळे गुरव, सांगवी प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे मताधिक्य निश्चित वाढणार आहे.
प्रदीप गायकवाड यांनी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील विविध समस्यांना सोशल मीडिया, पत्र, निवेदनांद्वारे मांडत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना दखल घ्यायला भाग पाडले आहे. या माध्यमातून अनेक समस्याही सोडवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रदीप गायकवाड यांच्यासोबत उदय ववले, राम कुंबरे, प्रकाश हादवे, मामा मिसाळ, दत्तोबा हतागळे व पवन साळुंके या मनसेच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.