ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

कोल्हापुर : । प्रा. पाटील गेल्या दोन वर्षांपासून घरीच होते. प्रा. एन. डी. पाटील यांचे पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असे होते. मात्र, एन.डी. या नावाने संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखत होता. कष्टकरी, वंचित, कामगार, मोलकरणी अशा सर्वांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांचा जन्म ढवळी (नागाव जि.सांगली) येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता. सीमा लढ्याचे प्रणेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते.पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

.  त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रा. पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खास वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.

  • शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
  • शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
  • शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
  • शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
  • सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
  • रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
  • रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

राजकीय कार्य

  • १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
  • १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
  • १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
  • १९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
  • १९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
  • १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
  • १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
  • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

मिळालेले सन्मान / पुरस्कार

  • भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००

Latest News