आमदारांच्या नावे जमिनीसाठी दबाव, बांधकाम व्यावसायिक अरुण पवार यांचा आरोप

IMG-20220118-WA0228

आमदारांच्या नावे जमिनीसाठी दबाव

बांधकाम व्यावसायिकाचा आरोप

पिंपरी : : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाचा गैरवापर करून माजी नगरसेवक शंकर जगताप, विजय जगताप, अमोल उंड्रे, तुषार झेंडे मला दमबाजी करीत आहेत. स्थानिक पोलिसांना हाताशी धरून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत, असा आरोप बांधकाम व्यावसायिक ऊर्फ सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांनी केला आहे.

या प्रकरणी गृहमंत्री, पोलिस आयुक्तांना निवेदन दिले असून, न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शंकर जगताप आणि त्यांचे काही नातेवाइक मी विकसनासाठी घेतलेल्या जमिनीसाठी माझ्यावर दबाव टाकत आहेत. त्यासाठी त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाचा गैरवापर केला आहे. स्थानिक पोलिसांना हाताशी धरून माझ्याविरोधात खोटे गुन्हे

‘आयुक्तांची भेट घेणार’

‘जगताप यांचा सहकारी सचिन कवडे याला ४० लाख रुपये देऊन टाक; अन्यथा तुझ्यावर गुन्हा दाखल करू,’ अशी धमकी पोलिस देत असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक अरुण पवार यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दाखल केले आहेत. मी विकसनासाठी घेतलेल्या जमिनीसंदर्भात बोगस सह्या करून माझी फसवणूक केली आहे. पिंपळे गुरव येथे विकसनासाठी घेण्यात आलेली ६२ गुंठे जागा माझी सहमती न घेता जगताप यांनी खरेदी करून घेतली. माझ्या नावे विकासकरारनामा व कुलमुखत्यारपत्र असतानाही फसवणूक केली. धनादेशाद्वारे बनावट सही करून माझ्या नावे कोट्यवधींचे व्यवहार केले. या प्रकरणी मी सहायक पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली आहे.

Latest News