सर्वसामान्य नागरिकांच्या राहत्या घरावर कारवाई करू नका- महापौर माई ढोरे यांचे आयुक्त राजेश पाटिल यांना निर्देश

पिंपरी: ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे गुंठेवारी नुसार नियमित कऱण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यापासून नव्याने अशी बांधकामे सुरू आहेत. कोरोना काळात एकाही बांधकामावर कारवाई करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. कोरोना काळात गुंठा अर्धा गुंठा जागेत सामान्य नागरिकांनी राहण्यासाठी घर बांधले असल तर त्यावर कारवाई करू नका, असे निर्देश महापौर माई ढोरे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत दिले.

रेडझोन, आरक्षण किंवा रस्ता रुंदिकरणात येणारी तसेच व्यापारी तत्वावरची अनधिकृत बांधकामे पाडायला आमचा विरोध नाही, असेही महपौरांनी स्पष्ट केले. बांधकामाच्या प्रारंभीच कारवाई केली असता समजू शकते, पण तीन-चार मजली इमारत बांधून झाल्यावर ती पाडून कोट्यवधी रुपयेंचे नुकसान करणे बरोबर नाही, त्यासाठी संबंधीत बिट निरीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर प्रथम कारवाई करा, अशी मागणी नगरेवसेवकांनी यावेळी केली

त्यामुळे गल्लीबोळात अनिधकृत बांधकामे सुरू झाली. महापालिका प्रशासनाने वारंवार त्याबाबत आवाहन केले मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही. आता ती सर्व बांधकामे पाडायची कारवाई सुरू अल्याने नगरसेवक नाराज आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी इमारतींवर कारवाईला विरोध दर्शविला. , तीन-चार मजली इमारती बांधून झाल्यावर त्या पाडणे चुकिचे आहे. कारवाई करायचीच तर फाऊंडेशनलाच करा. लोकांनी १०-१० कोटी रुपये खर्च करून झाल्यावर त्या इमारती भुईसपाट करण्यापेक्षा त्या महापालिकेने ताब्यात घ्याव्यात.

शरद नगर येथे एका इमारत मालकाचा केवळ कारवाईच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंब रस्त्यावर आले. अशा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ज्या बिट निरीक्षकांची आहे ते काय करतात, असा सवाल मंगला कदम यांनी उपस्थित केला.

भाजपाचे नगरसवेक राहुल जाधव यांनीही अत्यंत खरमरीत शब्दांत आपल्या भावना प्रकट केल्या आणि बिट निरीक्षकांनाच जबाबदार धरून त्यांच्यावर प्रथम कारवाईची मागणी केली. ते म्हणाले, हे बिट निरीक्षक महापालिकेचे वेतन घेतात, अशी बांधकामे सुरू असताना ते काय डोळ्यावर पट्टी ओढून फिरतात का. २-३ मजले बांधून झाल्यावर कारवाई करतात वाघेश्वर कॉलनी येथील हेंद्रे या व्यक्तीचे निधन त्यांची इमारत पाडल्याच्या धक्क्याने झाल्याने आता खरे तर महापालिका आयुक्त आणि बिट निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
भाजपाचे नगरसेवर अभिषेक बारणे यांनीही घर दुरुस्ती सुरू असेल त्यांच्यावर कारवाईला विरोध दर्शविला. ज्यांचे प्लॉन पास होत नाहीत असेच लोक अनधिकृत घर बांधतात त्यांच्यावर कारवाई नको, अशी मागणी बारणे यांनी केली.
नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले, महापालिका आयुक्त केवळ राजकीय भावनेतून सुडबुद्धीने मुद्दाम कारवाई करतात. ४० वर अनधिकृत बांधकामे पाडलीत. लोकांनी कर्ज काढून घरे बांधली होती. बिट संबंधीत निरीक्षकांवर प्रथम कारवाई करा.
पिंपरी चिंचवड शहरात सद्या अनधिकृत बांधकामांवरची कारवाई जोमात आहे. गेल्या महिनाभरात सुमारे पाऊनशेवर बांधकामे भुईसपाट करण्या आली

Latest News