रंगुनवाला डेंटल कॉलेजचा पदवीदान समारंभ…

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला कॉलेज आँफ डेन्टल सायन्स चा सोळावा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला .यावेळी 100 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी. ए.इनामदार हे होते. संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, प्राचार्य डॉ.रमणदीप दुग्गल, कुलसचिव आर ए शेख ,उपप्राचार्य डॉ विवेक हेगडे ,रश्मी हेगडे हे मान्यवर ,विद्यार्थी, पालक, प्राध्यापक वर्ग उपस्थित होता .यावेळी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पेशामध्ये प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याची शपथ घेतली. गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये डॉ अनम कच्छी,तसेच डॉ उझ्मा मुबीन यांचा समावेश होता.

Latest News