पुण्यातील रस्त्याच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये वाद..

पुण्यातील कात्रजमधील प्रभाग क्र. ३८मध्ये उत्कर्ष सोसायटीतील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये वाद जुंपला… या दोघांमध्ये थेट रस्त्यावरच वादविवाद सुरू झाला… उत्कर्ष सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम आणि भाजप नगरसेविका मनिषा कदम यांनी डांबरीकरण कामासाठी निधी आपणच मंजूर केला असल्याचे सांगताना दोघांमधील वादाचा व्हिडिओ समोर आला आहे…
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने नागरिकांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांमध्ये विकासकामे करण्याच्या स्पर्धा सुरू आहेत. त्यावरून अनेक ठिकाणी श्रेयवाद लढाई पाहायला मिळते. यातीलच हा प्रकार असल्याचे दिसून येते….