पुण्यात पुढील आठवडयात शाळा सुरू करू: उपमुख्यमंत्री अजीत पवार

पुणे: पुण्यातील कोरोनाचा आलेख अजून आठ – 15 दिवस राहील. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 23 टक्के तर पुण्याचा 27 टक्के इतका आहे. त्यामुळे अजून आठवडाभर पुण्यातील शाळा सुरू करू नयेत असा निर्णय झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी पत्रकारांना दिली

कोरोना रुग्णांवर उपचार करत नाही अशा दोन खासगी हॉस्पिटलबाबत तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींनंतर संबंधित हॉस्पिटलसोबत बोलणं झालं आहे.

. मात्र, पुण्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे पुण्यातील शाळासुरू होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पर्यटन स्थळावरील छोट्या दुकानदाराना परवानगी, सिंहगड, भीमाशंकरला नागरिकांना जाता येईल. लेण्याद्री वगळता अष्टविनायक आणि भीमाशंकर दर्शन घेता येईल. कोविडमुक्त ग्राम स्पर्धेला सुरवात झाली आहे. सर्व गावांनी स्पर्धेत सहभागी व्हायला हवं.पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार ! कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला.

पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे पुणे शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला असून दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.पुणे मनपा हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. .

Latest News