कोरोनामुक्त गाव अभियान पुणे विभागातही राबवा:उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्ह्यातील ग्रामस्थांना केले. पुणे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय कोरोनामुक्त गाव अभियानाचे उद्‍घाटन शनिवारी पवार यांच्या हस्ते आभासी पद्धतीने (ऑनलाइन) करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामस्थांना ऑनलाइन मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्यात राबविलेले कोरोनामुक्त गाव अभियान हे पुणे विभागातही राबवा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली.
या अभियानाच्या माध्यमातून आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनीसुद्धा या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन पवार यांनी यावेळीयावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) शांतिलाल मुथ्था आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘आता नागरिकांनाही या आजाराबाबतचे गांभीर्य लक्षात आले आहे. गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे संकट टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कारांची स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. बिजेएसच्या सहकार्याने पुण्यातील काही गावात राबविलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्याने तो राज्यस्तरावर राबविण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल.’’बीजेएसचे शांतिलाल मुथ्था यांनी प्रास्ताविक केले. पुणे जिल्ह्यातील ५५० गावांनी आपापले गाव कोरोनामुक्त मुक्त करण्यासाठी कृतिदलाची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले.

Latest News