पर्यावरणीय पत्रकारिता फेलोशिप २०२२ साठी अर्ज करण्याचे आवाहन

IMG-20220124-WA0114

पर्यावरणीय पत्रकारिता फेलोशिप २०२२ साठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे :

पर्यावरणीय क्षेत्रात लिखाण करणाऱ्या पत्रकारांच्या प्रोत्साहनार्थ ‘तेर पोलिसी सेंटर’या संस्थेतर्फे या वर्षी पहिल्यांदाच ‘पर्यावरणीय पत्रकारिता फेलोशिप’ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पर्यावरणसंबंधी लिखाण करणाऱ्या पत्रकारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.’तेर पोलिसी सेंटर’च्या संचालक डॉ विनीता आपटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

तेर पोलिसी सेंटर ही एक विना नफा या तत्वावर पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणारी ​स्वयंसेवी ​संस्था आहे. जी पर्यावरणाच्या शाश्वततेसाठी काम करते, तसेच वेगवेगळ्या माध्यमातून पर्यावरणीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देते. याच धर्तीवर पर्यावरणसंबंधी लिखाण करणाऱ्या पत्रकारांकडून ‘पर्यावरणीय पत्रकारिता शिष्यवृत्ती​ २०२२’ साठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

अर्जदारानी आपल्या अर्जाबरोबर कव्हर लेटर, वैयक्तिक माहिती जोडावी.
तसेच पूर्वी प्रकाशित झालेल्या ३ बातम्यांचे /लेखांचे नमुने किंवा दुरचित्रवाणीत काम करत असल्यास ​प्रसारित झालेले ​३ व्हीडीओ पाठवावेत. तेर पोलिसी सेंटर व बाह्य परीक्षकामार्फत अर्जाचे मूल्यमापन केले जाईल.निवडलेल्या व्यक्तीला ​दहा हजार रुपये फेलोशिप रक्कम देण्यात येईल.

फेलोशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारिख १५ फेब्रु​वारी २०२२ ही असून अर्जदार
पत्रकारिता क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील रहिवासी व्यक्ती असावी,
अर्जासाठी भाषेचे बंधन नाही,असेही संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे. terrepolicycentre@gmail.com या इमेल वर अर्ज,माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती www.terrepolicycentre.com या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ——————–

Latest News