कामगार नेते अण्णासाहेब पाटील स्मारक सुशोभीकरणाची पाहणी – कामगार नेते नरेंद्र पाटील, आमदार महेश लांडगे यांची भेट – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना

08

कामगार नेते अण्णासाहेब पाटील स्मारक सुशोभीकरणाची पाहणी
– कामगार नेते नरेंद्र पाटील, आमदार महेश लांडगे यांची भेट
– पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना
पिंपरी ।प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील केएसबी चौकात अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळा सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची आमदार नरेंद्र  पाटील यांनी पाहणी केली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, प्रदेश सचिव भाजपा महाराष्ट्र राज्य अमित गोरखे, महापालिका अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक वसाहतींचे नावाजलेले शहर आहे. शहराच्या औद्योगिक परिसरातील केएसबी चौक हा मुख्य चौक म्हणून ओळखला जातो. या चौकात कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या स्मारकाच्या परिसरातील सुशोभीकरणाचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. या कामाची आमदार नरेंद्र पाटील यांनी सोमवारी सकाळी पाहणी केली. या कामसंदर्भात पाटील यांनी आवश्यक सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. कामगार बांधवांचे प्रेरणास्रोत म्हणून या पुतळा आणि परिसराकडे पाहिले जाते.
**

Latest News