महाज्योतीचे उपकेंद्र पुण्यात करण्याचा निर्णय….


पुणे: विद्यार्थ्यांच्या अडचणी होणार दूर महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना दरवेळी नागपूरला जावे लागत होते. छोट्या- मोठ्या कामांसाठी नागपूरला फेऱ्या मारणे अनेक विद्यार्थ्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळेच पुण्यात महाज्योतीचे उपकेंद्र करावे अशी मागणी विद्यार्थ्यांच्याकडून होत होती.
आता पुण्यात केंद्र झाल्यामुळं विद्यार्थ्यांना नागपूरला होणार हेलपाटा वाचणारा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारी , अडचणीची सोडवणूक पुण्यातील केंद्रातूनच होणार आहेत. विश्रांतवाडीतील सामाजिक न्याय विभागात याचे उप केंद्र सुरु होणार आहे.राज्य शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी महाज्योती या स्वायंत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे उभारण्यात आले
. मात्र या संस्थेचे उपकेंद्र पुण्यात व्हावे अशी मागणी विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्यासाठी महाज्योतीचे संचालक प्रा.दिवाकर गमेयांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. तसेच शासन दरबारीही पाठपुरवठा करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या या मागणीला यश आले असून महाज्योतीचे उपकेंद्र पुण्यात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथे हे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे.आमच्या पाठपुराव्याला यश ओबीसी विद्यार्थीच्या सामाजिक,शैक्षणिक आणी आर्थिक उन्नतीसाठी राज्यशासनाने महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरु केली.त्याचे मुख्यालय नागपुरला आहे.
त्याचे उपकेंद्र पुण्यात मध्ये व्हावी.यासाठी गेली कित्येक महिने प्रा.दिवाकर गमे सर (महाज्योती महासंचालक ) यांच्या बरोबर आम्ही पाठपुरावा केला होता.त्यांची दखल शासनानी घेतले. सामाजिक न्याय विभाग विश्रांतवाडी या ठिकाणी उपकेंद्रास जागा मिळाली आहे. विद्यार्थींचा येथुन पुढे नागपुरला वेगवेगळया विषयी तक्रार घेउन जाण्याचा वेळ व खर्च वाचणार असल्याची भावना स्टुडंट हेल्पींग हँड या विद्यार्थीसंघट्नेचे अध्यक्ष कुलदिप आंबेकर यांनी केली आहे.