८१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे


८१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे
पीएमपीसाठी ६० कोटी रुपये केले मंजूर : ॲड. नितीन लांडगे
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२२) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारी पीसीएमटी आणि पिंपरी पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारी पीएमटी या दोन्ही परिवहन संस्थांचे 15 डिसेंबर 2007 ला पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) मध्ये विलिनीकरण करण्यात आले. यानंतर पीएमपीची संचलन तूट म्हणून पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका रक्कम देतात. बुधवारी (दि. २ फेब्रुवारी) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या पीएमपीसाठी ६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये जानेवारी २०२२ ची संचलन तुट १३.५६ कोटी रुपये, वैद्यकीय बिलांसाठी ५ कोटी रुपये, सातवा आयोग वेतन देण्यासाठी ४ कोटी रुपये आणि इतर देणी देण्यासाठी ३७.४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच या बैठकीत विविध विकासकामांसाठी ८१ कोटी ६४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना देखील मंजूरी देण्यात आली अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.बुधवारी (दि. २ फेब्रुवारी) ऑनलाईन पध्दतीने झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲड. नितीन लांडगे होते. विषय पत्रिकेवरुन एकूण २२ विषय आणि ऐनवेळचे एकूण २२ विषय अशा ४४ विषयांना या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यामध्ये