सत्तेचा गैरवापर करून पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना – गणेश बीडकर

.पुणे – महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा गैरवापर करून पुणे महापालिकेची) प्रारूप प्रभाग रचनातयार केली आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले आहे, त्यामुळे याविरोधात कायदेशीर लढा दिला जाणार आहे, असे सभागृहनेते गणेश बीडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तर भाजपचे नगरसेवक फोडल्याशिवाय राष्ट्रवादीला उमेदवार मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे. त्यामुळे आमचे १०० उमेदवार कोण आहेत हे जाहीर आहेच, हिंमत असेल तर राष्ट्रवादीने २४ तासात किमान ८० उमेदवारांची यादी जाहीर करून दाखवावी असे आव्हान दिले पुणेकर फक्त विकासाला मतदान करतात, थापाड्यांना नाही. टेंडरमधल्या टक्केवारीसाठी आंदोलन करणाऱ्यांना पुणेकर जागा दाखवतील. शहरात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल.
प्रारूप प्रभाग रचना करताना टेकडीमुळे तयार होणारी नैसर्गिक हद्द तोडून विचित्र प्रभाग जोडत आहेत, धार्मिक आणि जातीचा विचार करून एकगठ्ठा मतदारांचे पॉकेट काही प्रभागांना जोडले आहेत. त्यामुळे सरळमार्गाने निवडणूक जिंकता येणार नाही हेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.
१२२ जागांवर विजय मिळवू असा दावा जगताप करत आहेत, ही संख्या पुण्यासह इतर दोन तीन महापालिकांची एकत्र करून सांगत आहेत. स्वबळाची भाषा करणारी राष्ट्रवादी पुण्यात कधीही ६० च्या वर गेलेली नाही, त्यामुळे ‘बेडूक फुगवला म्हणून तो हत्ती होत नाही’, अशी टीका बीडकर यांनी केली