लता मंगेशकर यांचे मुंबईतील ब्रिच कँडी मध्ये ९२ व्या वर्षी निधन

लता मंगेशकर यांचे मुंबईतील ब्रिच कँडी९२ व्या वर्षी निधन झालं
मुंबई: लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती.
तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
आदल्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्याना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि त्या सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्या.
लता (९२) यांना 8 जानेवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते, जिथे त्यांच्यावर डॉ. प्रतित समदानी आणि डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अगदी काही दिवसांपूर्वी त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत,
अगदी सामान्य परिस्थितीतून अपार मेहनतीने त्यांनी कष्ट करून आघाडीची पार्श्वगायिका म्हणून स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत अनभिषिक्त गानसम्राज्ञी म्हणून नाव कमावलं. सर्व प्रकारची गाणी लतादीदी गायल्या आहेत. भावोत्कट स्वर, प्रसंगानुरूपच नव्हे तर पडद्यावर ज्या नायिकेसाठी आपला आवाज असणार आहे
त्या भूमिकेनुसार लता मंगेशकरांनी पार्श्वगायनातले बारकावे टिपले. सुस्पष्ट शब्दोच्चार आणि अलौकिक आवाज या जोरावर त्यांनी हे अढळ स्थान प्राप्त केलं. पण इथपर्यंत पोहोचण्याचा आणि ते स्थान शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रवास सहजसाध्य नव्हता.स्वरलता, गानकोकिळा, दैवी आवाजाची देणगी लाभलेली गानसरस्वरी… अशा अक्षरशः शेकडो अद्वितीय विशेषणांनी नावाजलेल्या महान गायिका लता मंगशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
सहस्त्रकातून एखाद्या कलाकाराला लाभतो असा आवाज, असा मान या गानसम्राज्ञीला मिळाला होता.28 सप्टेंबर 1929 रोजी तत्कालीन इंदोर संस्थानात जन्म झालेल्या लतादीदी मंगेशकरांच्या घरातलं थोरलं अपत्य. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं या आपल्या थोरल्या लेकीवर जीवापाड प्रेम. तिच्यातली गानप्रतिभाही त्यांनी खूप लहानपणीच हेरली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून लतादीदी अगदी लहानपणापासून आपसूकच ऐकून ऐकून ताना घेत असत. त्यानंतर त्यांनी रीतसर गाण्याचं शिक्षण घेतलं आणि लहानपणीच संगीत नाटकातून पं. दीनानाथ मंगेशकरांची ही लेक व्यासपीठावर वावरू लागली.दुर्दैवानं पित्याचं छत्र बालपणीच हरपलं आणि अवघ्या 13 व्या वर्षी छोट्या लताची लतादीदी झाली.
आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाठच्या भावंडांची पाठराखण करत आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत गायनाचा व्यवसाय म्हणून विचार करू लागली. 1942 मध्ये मास्टर विनायक यांच्य नवयुग सिनेमासाठी त्यांचं गाणं सुरू झालं, ते अगदी नव्वदीपर्यंत अविरत सुरू होतं. 1945 मध्ये लतादीदी मुंबईत आल्या आणि पार्श्वगायनाचं क्षेत्र त्यांच्यापुढे खुलं झालं. मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. अक्षरशः हजारो गाणी त्यांनी गायली. हिंदी-मराठीच नव्हे तर 36 भारतीय भाषांतली गाणी लतादीदींनी गायली2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. त्यापूर्वी त्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराच्याही मानकरी ठरल्या होत्या. याखेरीज फ्रेंच आणि ब्रिटीश सरकारचे सर्वोच्च नागरी सन्मानही लता मंगेशकर यांना मिळाले.