काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर आघाड़ी चा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार
प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट स्वबळाचा नारा दिला होता. त्यावर सेनेनेही स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतला. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार का, याबाबत अद्याप संभ्रम आहे
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, कमल व्यवहारे, कुमार गोसावी, माजी महापौर अंकुश काकडे, दत्ता धनकवडे, वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले यांच्यासह माजी उपमहापौर दीपक मानकर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांच्या बैठकीत उमटला
. या दोन्ही पक्षांनी अवास्तव जागांची मागणी केली तर स्वबळावर निवडणूक लढवावी, असे या वेळी निश्चित करण्यात आले.यासंबंधीचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.काँग्रेस व शिवसेनेबरोबर या बैठकीत मते जाणून घेण्यात आली. यात बहुतांश जणांनी भाजपला रोखण्यासाठी आघाडी करून निवडणूक लढविली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
तर काहींनी प्रभाग रचना पक्षासाठी अनुकूल झाली आहे, त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवून ताकद अजमावून बघितली पाहिजे, असेही मत व्यक्त केले. दरम्यान, आघाडीसाठी दोन्ही पक्षांना देण्यात येणार्या जागांबाबत चर्चा झाली. दोन्ही पक्षांना 2017 मध्ये मिळालेल्या एकूण जागा आणि दुसर्या क्रमांकावर असलेल्या जागा या फॉर्म्युल्यानुसारच जागा वाटप व्हावे. अवास्तव जागांची मागणी केली
तर पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी ठेवावी, असे बैठकीत ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यावर यासंबंधीचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्र्यांना देण्याचा निर्णयही एकमताने घेण्यात आला.