शिवजन्मभूमी जुन्नर पीएमपी बस सुविधा लोकार्पण उत्साहात कामागार नेते सचिन लांडगे, भाजपा नेत्या आशा बुचके यांची उपस्थिती


शिवजन्मभूमी जुन्नर पीएमपी बस सुविधा लोकार्पण उत्साहात
- कामागार नेते सचिन लांडगे, भाजपा नेत्या आशा बुचके यांची उपस्थिती
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२२) भोसरीतील बसटर्मिनल ते शिवजन्मभूमी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जुन्नर या मार्गावरील पीएमपी बस सुविधेचे लोकार्पण उत्साहात करण्यात आले. त्यामुळे हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या किल्ले शिवनेरीला जाण्यासाठी शिवभक्त आणि पर्यटकांना आणखी एक सुविधा निर्माण झाली आहे.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी किल्ले शिवनेरीला जाणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी. याकरिता पीएमपीएमएल प्रशासनाकडे भोसरी ते जुन्नर अशी बस सुविधा सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला होता. प्रशासनाने आता ही सुविधा सुरू केली आहे.