पालकमंत्री यांच्या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली:महापौर माई ढोरे

पालकमंत्री यांच्या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली
पिंपरी दि. ११ फेब्रुवारी २०२२ – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या महिन्यापुर्वी शास्ती कर वगळून मुळ कर घेण्यात येईल अशी बतावणी केली होती परंतु प्रत्यक्षात महिना झाला तरीही प्रशासनाकडून नागरिकांना शास्तीकर भरण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे.
सन २००८ मध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना शास्तीकराचा बोजा नागरिकांच्या मानगुटीवर टाकण्यात आला. राष्ट्रवादीची नेतेमंडळी निवडणूक तोंडावर आलेली असताना नागरीकांच्या भावनेशी खेळत आहे. प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मा. पालकमंत्र्यांच्या नावाने शास्तीकर वगळून मुळ मिळकतकर घेण्यात येईल अशी बतावणी राष्ट्रवादी पक्षाच्या नेतेमंडळींकडून करण्यात आली. पण महिना झाला तरीही प्रशासनाकडून पालकमंत्र्यांच्या मागणीची प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून जनतेची वेळोवेळी दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
.