सुदाम ढोरे यांचे निधन


सुदाम ढोरे यांचे निधन
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२२) सांगवी गावचे ज्येष्ठ नागरिक सुदाम रघुनाथ ढोरे (वय ७९ वर्षे) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (दि. १० फेब्रुवारी) निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन विवाहित मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. सुदाम ढोरे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी स्व. खा. आण्णासाहेब मगर, स्व. खा. शंकरराव बाजीराव पाटील, स्व. माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे, माजी खासदार नानासाहेब नवले, माजी खासदार अशोक मोहोळ यांचा समवेत कॉंग्रेसचे काम केले आहे तसेच कॉंग्रेसचे संघटन उभारण्यात ढोरे यांचा मोलाचा वाटा होता. पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे ते मागील सात वर्षापासून सल्लागार समिती सदस्य म्हणून कार्यरत होते.