विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष! भाजप सोडू पाहणाऱ्या नगरसेवकांना ‘एसएमएस’? मला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका,

देवेंद्र फडणवीस यांचे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष! भाजप सोडू पाहणाऱ्या नगरसेवकांना फडणवीसांचे ‘एसएमएस’? मला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका,

पिंपरी ( परिवर्तनाचा सामना) राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षातील नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यानूसार भाजप नगरसेवकांची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी जवळीक वाढलेल्या काही नगरसेवकांना “एसएमएस” करत तुम्ही, मला भेटल्याशिवाय कोणताही निर्णय घेवू नका. असा निरोप दिल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. पण सत्तेत भाजप नाही, अशी परस्थिती असल्याचे अनेक विद्यमान आणि निष्ठावान नगरसेवक बोलून दाखवितात. कारण, भाजपची सत्ता मनमानी पध्दतीने कारभार करीत पाच वर्षे सत्ता भोगली. अनेकांना पालिकेतील पदे न देता कात्रजचा घाट दाखविला.

तर काहीची राजकीय कोंडी करत प्रभागातील कामांना कात्री लावत निधी अडविला. त्यामुळे नाराज नगरसेवक भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत.

महापालिकेत राष्ट्रवादीच्या स्थानिक सरदारांनी वारेमाप भ्रष्टाचार केला. त्यामुळेच महापालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला आस्मान दाखवत भ्रष्ट कारभाराला कंटाळून पराभव केला. एकेकाळी दोन-तीन नगरसेवक असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी शहरवासियांना आश्वासने देवून महापालिका ताब्यात घेतली. महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश आले.

पुणे ,पिंपरी-चिंचवड, शहरात ‘नवा गडी-नवे राज्य’ सुरु झाले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,चिंचवडचे आमदार तथा माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार तथा विद्यमान शहराध्यक्ष महेश लांडगे हे शहराचे नवे कारभारी म्हणून कामकाज पाहू लागले. सत्तेची दोरी दोन्ही कारभा-यांच्या ताब्यात आल्याने पालिकेतील सगळी सुत्रं त्यांनीच हलवली. विविध पदे वाटप करताना आपल्याच बगलबच्चांना संधी दिल्याची अनेकांना खंत आहे

. त्यात महत्वांच्या व आर्थिक तिजोरीच्या पदापासून निष्ठावांनाना अलगद बाजूला सारण्यात आले. आपल्यापेक्षा कोणीही डोईजड होवू नये, याची पुरेपूर खबरदारी घेत दोघांनीही सत्तेचा समतोल साधत पदाचे वाटप केले. तसेच प्रभागातील विविध विकास कामात निधीची कमतरता ठेवत पक्षातील काही नगरसेवकांची कोंडी देखील केली. तर काहींना परवानगीशिवाय महासभेत बोलण्याची मुभा देखील मिळाली नाही. त्यामुळे गेली पाच वर्षे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणा-या’ नगरसेवकांनी महापालिका निवडणुकीत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

‘गल्ली ते दिल्ली’ भाजपची सत्ता असल्याने पुणे,पिंपरी-चिंचवड शहराचा आणखी विकास होईल, अशी भाबडी आशा शहरवासियांची होती. शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, शास्तीकरांचा प्रश्न, वाढते नागरीकरणांमुळे बंदिस्त पवना जलवाहिनीचा प्रश्न, आंद्रा, भामा-आसखेड पाणी प्रश्न, संरक्षण हद्दीतील रेडझोनचा प्रश्न, अतिप्रदुषित असलेल्या पवना-इंद्रायणी नदी सुधारचा प्रश्न यासह असंख्य प्रश्न सोडवण्याची ग्वाही भाजपच्या नेत्यांनी सत्तेत येण्यापुर्वी दिली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत प्रश्न ‘जैसे थे’च आहेत.

भाजप नगरसेवक अजितदादांच्या गळाला?

गेली अडीच वर्ष झाले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे .पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील पुर्वाश्रमीचे कारभारी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे भाजप नगरसेवकांना जवळ करुन त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना आपलंस करत आहेत. नुकतेच . तर प्रभागासह शहरातील विविध प्रश्न घेवून भाजप नगरसेवक अजित पवारांच्या उंबरठ्यावर जावून उभे राहू लागले आहेत. त्यांचे प्रश्न तातडीने सोडत त्यांना खूश करण्याचा प्रयत्न पवारांकडून होवू लागला आहे. अजित पवारांसोबतचे भाजप नगरसेवकांचे फोटो प्रभागात व्हायरल होत आहेत. त्यावरुनच आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपातील 25 ते 30 नगरसेवक राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

Latest News