खासदार संजय राऊत यांची केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल…
भाजपचं लोक मला तीनवेळा भेटले. त्यांनी वारंवार मला सांगितले की तुम्ही मध्ये पडू नका. आमचं सरकार येण्यासाठी मदत करा. जर तुम्ही लोकांनी मदत केली नाही. तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, अशा धमक्या देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
हे सरकार पडणार नाही हे जेव्हा त्यांना मी सांगितले तेव्हा माझ्या नातेवाईकांवर ईडीच्या धाडी पडल्या. तिहार जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या, असा दावा त्यांनी केला.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रातील सरकार त्यांना पाडायचे आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. एकतरी तुम्ही गुडघे टेका नाहीतर सरकार घालवू, अशी धमक्या दिल्या जात आहेत. पण आम्ही झुकणार नाही. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही, मराठी माणूस बेईमानी नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपला खडे बोल सुनावले.संबंधित बातम्या