पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा..भाजपा खिंडार

WhatsApp-Image-2022-02-16-at-12.42.29-PM

पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा..
आमदार महेश लांडगे यांच्या मर्जीतील नगरसेवकाने सोडली साथ…

पिंपरी (परिवर्तनाचा सामना ) :- आमदार महेश लांडगे यांच्या मर्जीतील भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज बुधवारी (दि. १६) रोजी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.

मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. ते झाले नाही. परिणामी, विकास कामांना गती मिळाली नाही.

अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असल्याचे वसंत बोराटे यांनी सांगितले. लवकरच पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही ते म्हणाले.

गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांकडून ज्या नगरसेवकांना प्रलोभन दाखविण्यात आली त्यांना शेवटपर्यंत उपेक्षित रहावे लागले; ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रभागातून बोराटे निवडून आले त्याच प्रभागातील सत्ताधारी भाजपची आणखी एक नगरसेविका पदाचा राजीनाम देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. आमदार महेश लांडगे यांनी नाराज नगरसेवकांचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी, त्यात त्यांना यश मिळताना दिसत नाही. आता ही गळती ते कशी रोखणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे

Latest News