आकुर्डीत ‘राहूल कुमार बजाज’ स्मारक उभारण्यास मान्यता : ॲड. नितीन लांडगे भोसरीत उभारणार बहुमजली वाहनतळ पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२२) शहराच्या औद्योगिक विकासात बजाज उद्योग समुहाचे महत्वपुर्ण योगदान आहे. बजाज समूहाचे माजी अध्यक्ष व माजी खासदार पद्मभुषण राहूल बजाज यांचे नुकतेच निधी झाले. त्यांच्या स्मरणार्थ आकुर्डी चौकात ‘राहूल कुमार बजाज’ स्मारक उभारण्यास स्थायी समितीने बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता दिली. तसेच मुळा (मुठा) नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे मनपा बरोबर संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. मुळा नदीच्या १४.२० कि.मी. लांबीचा प्रवाह पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतून जातो. यासाठी लागणा-या ७५० कोटी रुपयांच्या विविध कामांची मंजुरी मिळावी अशी पुढील मान्यतेने मनपा सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्यात आली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मागील आठवड्यातील तहकूब केलेली आणि बु्धवारी (दि. १६ फेब्रुवारी) ची बैठकी झाली.
या बैठकीत एकूण १२० विषय मंजूर करण्यात आले. यामध्ये ७९,३६०.९९ रुपयांच्या विविध विकास कामांना मंजूरी देण्यात आली
. यामध्ये प्रभाग क्र. ५ मधिल भोसरी आळंदी रस्त्यावरील सखुबाई गबाजी गवळी उद्यान येथे बहुमजली वाहनतळ उभारण्यासही मान्यता देण्यात आली. यासाठी येणा-या ७,३४,१७,१६१ रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली
. या बहुमजली वाहनतळामुळे भोसरी – आळंदी रस्त्यावरील आणि भोसरी परिसरातील वाहने पार्किंग करण्याचा प्रश्न मिटणार आहे. याचा फायदा येथिल वाहतूक सुरळीत होण्यासाठी होईल. परिणामी येथिल व्यवसायिकांच्या व्यवसायात आणि भोसरीतील व्यापा-यांच्या व्यवसायात देखिल वाढ होईल.
तसेच दिघी येथे माजी सैनिक विकास संघ हि संस्था मागील अनेक वर्षांपासून माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, पेन्शनर व त्यांच्या परिवारासाठी मिळणा-या कल्याणकारी, योजना राबविण्यासाठी काम करीत आहे.
भोसरी, दिघी, बोपखेल, गणेशनगर, मोशी, च-होली या परिसरात पाच हजारांहून जास्त माजी सैनिक राहत आहेत. पिंपरी चिंचवड मनपाने दिघी येथे शहिद कर्नल संतोष महाडीक बहुउद्देशीय भवन उभारण्यात आले आहे
. या इमारतीतील दुसरा व तिसरा मजला माजी सैनिक विकास संघ, दिघी या संस्थेस पुढील पाच वर्षांसाठी वापरणे करिता करार करुन देण्यात यावा यासाठीही मंजूरी देण्यात आली आहे.