अरविंद एज्युकेशन सोसायटीत शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी

IMG-20220219-WA0288

अरविंद एज्युकेशन सोसायटीत शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी

पिंपरी, प्रतिनिधी :
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, संस्थेचे सचिव प्रणव राव यांच्यासह मुख्याध्यापिका आशा घोरपडे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, कीर्ती शिंपी, प्रीती पितळे, शिक्षकवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या राजदरबारातील अष्टप्रधान मंडळाचे सादरीकरण केले. अष्टप्रधान मंडळाच्या कार्यशैलीवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी पोवाडे गायले, तसेच पाळणाही म्हटला. विद्यार्थ्यांचा उत्साह अद्वितीय असा होता.
आरती राव यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंती साजरी कराच, पण त्यांनी केलेले कार्य अमलातही आणावे, असे आवाहन केले. शिक्षिका कीर्ती शिंपी यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले ? त्यांचे कार्य, महत्त्व आणि जीवनकार्य उलगडून सांगितले. आशा घोरपडे यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.

प्रशालेतील सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती पितळे यांनी केले.=

Latest News