मराठवाडा जनविकास संघातर्फे छ. शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

मराठवाडा जनविकास संघातर्फे छ. शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पिंपरी: मराठवाडा जनविकास संघाच्या मुख्य कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी छ. शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देत शिवाजी महाराज समजून घ्यायला हवेत आणि ते समजण्यासाठी महाराजांचा इतिहास समजून घेऊन तो आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे. त्यातूनच आपण आयुष्याची लढाई लढण्यासाठी सिद्ध होऊ शकतो. महाराजांच्या गुणांना आत्मसात केल्यास यशस्वी व्हाल. रयतेचा राजा असे म्हटले की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे नाव येत नाही.
समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांनी सांगितले, की शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना असंख्य अडचणी, समस्या आल्या. प्रत्येक टप्प्यावर अडचणींवर मात करूनच शिवाजी महाराज पुढे गेले. समस्या आहेत म्हणून शिवाजी महाराज कधी निराश झाले नाहीत, तर जिद्दीने, चातुर्याने शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली.
यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेविका चंदाताई लोखंडे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, उद्योजक बालाजी पवार, प्रदीप गायकवाड, अनिसभाई पठाण, संजीवनी पुराणिक, दत्तोबा हातागळे, साहेबराव तुपे, बबन काळे, किसन फसके, अमोल खंडागळे, संतोष आगळे, सचिन देडे, विलास थोरात, रिजवान शेख आदी उपस्थित होते.

Latest News