छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी देशाचा तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे


पुणे(परिवर्तनाचा सामना ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी देशाचा तिरंगा फडकवणे म्हणजे हा योगायोग आहे. त्यातच मतदान हे शस्त्र असून देशाची लोकशाही अबाधित राखण्यासाठी समाजातील मतदारांनी मतदान करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मतदारराजांनी आपले मतदान व्यर्थ जाऊ देऊ नका. याबरोबरच लोकशाही टिकविण्यासाठी समाजातील मतदारांपर्यंत जाऊन त्यांच्यात मतदानाविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे विश्रांतवाडी – देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिनसाजरा करत असतांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ( यांच्या जन्मदिनीदेशाचा तिरंगा (Tiranga Flag) फडकविण्याचामान मिळाला याचा अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येरवडा येथील डॉ. चिमा उद्यान येथे उभारण्यात आलेल्या ४५ मीटर तिरंगा ध्वज स्तंभाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
. यावेळी पक्षाचे संपर्कप्रमुख सचिन आहिर, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, पृथ्वीराज सुतार, पालिका गटनेते संजय भोसले, नगरसेविका श्वेता चव्हाण, अविनाश साळवे, अमृत पठारे, वडगाव शेरी विधानसभा मतदारा संघाचे विभागप्रमुख सोमनाथ खांदवे, आनंद गोयल, माजी नगरसेवक सचिन भगत, शंकर चव्हाण आदी शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते
यावेळी नारायण राणे व किरीट सोमय्या यांच्याविषयी ते म्हणाले की, हे किरीट सोमय्या व नारायण राणे ठाकरे कुटुंबियांना व मातोश्रीला लक्ष केंद्रित करत असून मीडियाने देखील त्यांच्याकडे किती लक्ष द्यावे हे मीडियानेच ठरवावे असे ठाकरे यांनी सांगितले.
यादरम्यान मावळ व मुळशी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन हाती बांधले. तर रणरणत्या उन्हात ही शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. तर परिसरात भगवे झेंडे फडकविण्यात आल्याने व शिवसैनिक महिलांनी भगव्या साड्या परिधान केल्याने परिसर भगवेमय झाले होते
. यावेळी जय शिवाजी,जय भवानीच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमला होता. त्यामुळे परिसर भगवेमय झाला होता. तर परिसरात काहीही अनुचित घटना घडू नये. याकरिता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ठाकरे यांना पाहण्यासाठी शिवसैनिकांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक संजय भोसले यांनी केले होते.