भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, शिक्षण शुल्क ऑनलाइन फॉर्म भरण्याकरिता मुदतवाढ


मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच राज्य पुरस्कृत शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) या योजनांचे महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन फॉर्म भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली असून आता अंतिम मुदत दि. २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत करण्यात आलेली आहे.
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेकरिता केंद्रशासनाने याअगोदरच अंतिम मुदत दिली होती मात्र राज्य शासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे सदर योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याकरीता मुदतवाढ 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत देण्यात आलेली आहे. याअगोदर सहा वेळेस अर्ज भरण्यास मुदतवाढ शासनाकडून देण्यात आली होती तेव्हा सदर योजनेकरिता अर्ज करावयाची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२२ अंतिम असून राज्यातील विद्यार्थी, पालक तसेच संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी तात्काळ नवीन तसेच नूतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टल द्वारे विहित वेळेत नोंदणीकृत करून घ्यावेत असे जाहीर आव्हान मा. मंत्री महोदय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात येत आहे.