पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे व सर्व स्थायी समिती सदस्यांचे हार्दिक धन्यवाद

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये संत तुकाराम नगर आरक्षण क्रमांक 51 येथे अद्ययावत पत्रकार भवनात बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली
पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवन उभे राहावे यासाठी कै. भा. वि. कांबळे यांनी प्रयत्न केले होते व त्यांच्या प्रयत्नांमुळे संत तुकाराम नगर एसटी स्टँड लगत दहा गुंठे जागेवर शासनाने पत्रकार भवन साठी मंजुरी दिली होती. मात्र काही कारणांमुळे गेली वीस वर्षे होऊन सुद्धा येथे पत्रकार भवन उभे राहू शकले नव्हते मात्र आज झालेल्या स्थायी समितीमध्ये या पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी नवे लेखाशिर्ष निर्माण करून एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या कामी भोसरी विधानसभेचे आमदार व भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष महेश दादा लांडगे स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे यांनी मोलाचे सहकार्य केले. सदरचा प्रस्ताव साई समिती सदस्या भिमाबाई फुगे यांनी मांडला असून त्याला सूचक म्हणून पोर्णिमा सोनवणे यांनी सहकार्य केले आहे.
या संदर्भात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे हार्दिक धन्यवाद