भूम परांडा रहिवाशांचा आकुर्डीत रविवारी स्नेहमेळावा ना. डॉ. प्रा. तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन

भूम परांडा रहिवाशांचा आकुर्डीत रविवारी स्नेहमेळावा
ना. डॉ. प्रा. तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन
पिंपरी (17 जुलै 2019) : भूम परांडा येथील पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशांच्या वतीने रविवार दि. 21 जुलै रोजी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जलसंधारण मंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भूम परांडा रहिवासी पिंपरी चिंचवड संघाचे अध्यक्ष युवराज कोकाटे व निमंत्रक चंद्रकांत सरडे यांनी पिंपरी येथे बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आकुर्डी चौकातील खंडोबा मंदिर कार्यालयात रविवारी (21 जुलै) दुपारी 2.30 वाजता आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्यात खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार गजानन बाबर, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेना कामगार नेते इरफान सय्यद, भूम तालुका शिवसेना प्रमुख सुरेश कांबळे, पुणे मनपा शिवसेना गटनेते अशोक हरणावळ आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
स्नेहमेळाव्याच्या आयोजनात दीपक गटकळ, कैलास कुदळे, सचिन शिंदे, भाऊ हरणावळ, सुजाता गजरमल, पप्पू वायसे, सुर्यकांत देशमुख, रामराजे सावंत, प्रवीण चव्हाण, अंकुश गायकवाड, प्रितम मेटे, पप्पू पाटोळे, दीपक कांबळे, शरद जाधव, निलेश चव्हाण, जयराम लांडगे, खंडू कोळी, माऊली जाधव, बालाजी महाजन, संतोष बाबर, विशाल जाधव, कुश कोकाटे, शहाजी कारकर, संतोष सुर्यवंशी आदींनी सहभाग घेतला आहे.

स्नेहमेळाव्यास भूम परांडा येथून पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असेही आवाहन युवराज कोकाटे व चंद्रकांत सरडे यांनी केले आहे.

Latest News