महाराष्ट्रात 1 नंबरचा पक्ष बनवायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा.जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, आम्ही महाराष्ट्रात ७२ आमदार निवडून आणले होते. त्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आली होती. पण सर्वांना बरोबर घेऊन चालायचं असल्याने ती संधी आम्ही सोडली.

पण आता २०२४ ला आम्ही ११४ लढवू किंवा १२० लढवू. आघाडी होईल त्यावेळी निर्णय होईल. पण जेवढ्या जागा लढवू तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणण्याची जिद्द आपण बाळगली पाहिजे. आजही पवारसाहेब २४ तास काम करत आहे. त्यामुळे २०२४ ला त्यांना सगळ्यात मोठे गिफ्ट द्यायचे आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याची संधी चालून आली होती. पण एकत्रित काम करायचं असल्याने आपण ती सोडली. मात्र आता २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला महाराष्ट्रात १ नंबरचा बनवायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा, आपल्याला शरद पवार यांना भेट द्यायची आहे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले

तळेगाव (पुणे) येथील आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी तरुणांचे कौतुक केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण काम करत आहेत. हे तरुण चांगले काम करत आहे. आता २०२२४ च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी महाराष्ट्रातील १ नंबरचा पक्ष बनवायचा आहे. त्यामुळे आत्तापासून तुम्ही कामाला लागला असे आवाहन करत येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील यांनी बोलून दाखवले आहेत.

Latest News