पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ निवडणुकीचा 294 मतांचा घोळ, तीन दिवस उलटूनही निकाल नाही;


:पिंपरी चिंचवड महापालिका तीन दिवस उलटूनही महापालिका कर्मचारी महासंघ निवडणुकीचा 294 मतांचा घोळ संपेना;
पिंपरी (परिवर्तनाचा सामना ) पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या निवडणुकीचा घोळ कायम आहे. तीन दिवस उलटले तरी अध्यक्षपदाचा निकाल जाहीर झाला नाही. निवडणुकीसाठी झालेल्या मतदान मोजणीत मोठा घोळ झाला. मतांमध्ये मोठी तफावत झाल्याची तक्रार करत आपला महासंघ पॅनलचे प्रमुख अंबर चिंचवडे यांनी फेरमोजणीची मागणी लेखी पत्राद्वारे केली. तर, विजयी उमेदवारास पराभूत करण्याचे प्रयत्न या माध्यमातून केले जात असल्याचा आरोप विजयी सरचिटणीस उमेदवार अभिमान भोसले यांनी केला आहे त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महासंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.25) झालेल्या मतदानात एकूण 5 हजार 505 कर्मचार्यांनी मतदान केले. त्यानंतर मतमोजणीस सुरूवात झाली. मोजणी शनिवारी (दि.26) रात्री साडे अकरा वाजता संपली. अध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले शंकर अण्णा गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे आणि आपला महासंघ पॅनलचे अंबर चिंचवडे या दोघांमध्ये केवळ 9 मतांचे अंतर आहे. आकडेवारीत 294 मतांची बेरीज लागत नाही
तसेच, इतर उमेदवारांच्या मतांमध्येही घोळ आहेत, अशी तक्रार करीत अंबर चिंचवडे यांनी फेरमोजणीची मागणी शनिवारी (दि.26) केली आहे. मोजणी पूर्ण होईपर्यंत कोणतेही निकाल जाहीर न करण्याची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी अध्यक्ष पदाचा निकाल राखून ठेवला आहे. इतर 24 उमेदवारांचा निकाल जाहीर केला आहे. अध्यक्ष पदाच्या मतांच्या आकड्यांची गोळाबेरीज करण्याचे काम सोमवारी (दि.28) रात्रीपर्यंत सुरू होते. त्यामुळे मतमोजणीचा घोळ तिसर्या दिवशीही मिटला नव्हता. परिणामी, दोन्ही पॅनलमधील सदस्यांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
दरम्यान, शंकर अण्णा गावडे पॅनलचे अभिमान भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एका पदासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया वेठीस धरणे योग्य नाही. एकूण 25 पैकी 19 जागा आम्ही जिंकल्या असल्याने त्यांनी लोकशाहीचा आदर ठेवून, तो स्वीकारावा अन्यथा इतर पर्यायाचा विचार केला जाईल.
निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव म्हणाले, “मतांच्या मोजणी चार्टवरून बेरीज करण्याचे काम सुरू आहे. बेरीज पूर्ण झाल्यानंतर फेरमोजणी घ्यायची किंवा नाही याचा निर्णय घेतला जाईल”.
इतर पदावरील विजयी उमेदवार –
मनोज माछरे, महादेव बोत्रे (दोघे उपाध्यक्ष), अभिमान भोसले (सरचिटणीस), मंगेश कलापुरे (चिटणीस), उमेश बांदल (सहसचिव), नितीन समगीर (कोषापाल), दिगंबर चिंचवडे (मुख्य संघटक), शुभांगी चव्हाण (संघटक), लाला गाडे, तुषार कस्पटे, संजय कापसे, सुरज टिंगरे, चंद्रशेखर गावडे, धर्मेद्र शिंदे, नंदकुमार इंदलकर, अण्णासाहेब वाघोले, दत्तात्रय ढगे, विशाल बाणेकर (सर्व सदस्य) हे सर्व उमेदवार शंकर गावडे पॅनलचे आहेत. तर, सुप्रिया सुरगुडे (उपाध्यक्ष), कार्यकारणी सदस्य रूपाली कड, गोरख भालेकर, विक्रम लांडगे, नीलेश घुले, विकास काळजे हे विजयी उमेदवार आपला महासंघ पॅनलचे आहेत.: