पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप


पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप
पिंपरी (दि. ३ मार्च २०२२) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे प्रमुख शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे आणि इतर विजयी उमेदवारांना गुरुवारी (दि. ३ मार्च) निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी प्रमाणपत्र देवून अभिनंदन केले.
पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) निवडणूक झाली होती. मतमोजणी झाल्यानंतर अध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार अंबर चिंचवडे यांनी अध्यक्षपदाच्या मतांवर आक्षेप नोंदविला होता. यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करुन निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी मंगळवारी सर्व निकाल घोषित केला.
स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांना एकूण २५३४ मते मिळाली.