पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा हेमंत रासने

पुणे : स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून भाजपचे हेमंत रासने यांची निवड झाली आहे. समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा रासने यांची निवड झाली आहे. या अध्यक्ष पदासाठी भाजपकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. हेमंत रासने यांनी 10 विरूद्ध 6 असा विजय मिळवून राष्ट्रवादीचे उमदेवार प्रदीप गायकवाड यांचा पराभव केला आहे..
नगरसेवक हेमंत रासने यांची सलग चौथ्या वेळी अध्यक्षपदावर निवड झाली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत 28मार्च रोजी संपली. तर महापालिकेची मुदत 14 मार्च रोजी संपणार आहे. त्यासाठी 1 मार्च ते 14 मार्च या 14 दिवसांसाठी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले गेले आहेत
. एकापेक्षा अधिकवेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवणारे रासने हे एकमेव नगरसेवक ठरणार आहेत. यी समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण 16 सदस्य आहेत. पीएमपीचे व्यवस्थापक संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.
महापालिकेचा कार्यकाल 14 मार्चला संपुष्टात येत आहे. त्यानंतर पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच ओबीस आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणूक लांबलीच तर आपल्या प्रभागात केलेली विकासकामे तशीच पडून राहतील याची भीती सत्ताधाऱ्यांना आहेत. यामुळेच येत्या दहा दिवसात अशा कामांची उद्घाटने उरकण्यावर सत्ताधारी भाजप तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाच्या नगरसेवकांची धांदल उडणार आहे. या सगळ्यासाठी भाजपच्या दृष्टीकोनातून स्थायी समितीच्या अध्यक्षपदी हेमंत रासने येणे महत्त्वाचे आहे.