मेट्रोचे कामचं पूर्ण झालेले नाही, त्याचे उद्घाटन : शरद पवार

हा प्रकल्प सुरु व्हायला अजून अनेक दिवस लागतील.”
पुणे: पंतप्रधान मोदींच्या याच दौऱ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात बोलताना ज्या मेट्रोचे कामचं पूर्ण झालेले नाही त्याचे उद्घाटन होते आहे, असा टोला लगावला ज्या मेट्रोचे अजून कामचं पूर्ण झालेले नाही, हा प्रकल्प सुरु व्हायला अजून अनेक दिवस लागतील. पण त्या कामचं उद्घाटन होते आहे. असे ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (६ मार्च) पुणे (Pune) दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या स्वागतासाठी आणि एकूणच या दौऱ्याची जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यांच्या हस्ते बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे
. तसेच संगमवाडी ते बंडगार्डन या नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन अशाही कार्यक्रमांचा यात समावेश आहे
शरद पवार यांनी यावेळी नदी सुधार प्रकल्पावर देखील भाष्य केले. ते म्हणाले, आता मोदींना माझी अजून एक विनंती आहे. नदी सुधार करण्याची गरज आहे. नदी सुधारण्याचं काम हाती घेतलं पाहिजे. पण या नदीवर अनेक या धरणं आहेत. त्यामुळं कधी ढगफुटी झाली तर या मोठ्या संकटाची झळ आजूबाजूच्या गावातील लोकांना बसणार आहे. याबाबत मी पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग, पर्यावरणवादी अशा सर्व तज्ञांची एक संयुक्त बैठकं घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण उद्या काही संकट आली तर ते आपल्यालाच बघावं लागणार आहे. पंतप्रधान येतायत याचा विचार केला पाहिजे, करण्याची गरज आहे, असाही सल्ला पवारांनी पंतप्रधान मोदींना दिला
शरद पवार यांनी आज बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले, जग एका संकटातून जात आहे. पण आपण कोरोना संकटातून बाहेर आलो आहे. कोरोना काळात सगळा रोजगार, व्यापार थांबला. कोरोना संकटासारखा गंभीर कधी संकट कधी आलं नव्हतं. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला अन काम केली. मला घरात बसा म्हणायचे पण महाराष्ट्र संकटात असताना मी घरात बसू शकत नाही. सर्व शासकीय यंत्रणा काम करत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या काळात चांगले काम केले. राजेश टोपे माझ्याबरोबर फिरले. लोक त्यांना डॉक्टर राजेश टोपे म्हणत. कारण ते डॉक्टरांच्या बरोबर काम करत होते, असे म्हणतं टोपेंची पाठं थोपटली.