15 मार्चपासून पुणे महापालिका प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे जबाबदारी…

पुणे – पुणे महापालिकेची (Pune Municipal) मुदत संपण्यापूर्वी आचारसंहिता (Code of Conduct) लागणे अशक्य असल्याने आता महापालिकेवर प्रशासक (Administrator) नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने (State Government) घेतला आहे. १५ मार्च पासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून काम करणार आहेत.पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी- मार्च महिन्यात होऊन १३ मार्च पूर्वी नवी महापालिका अस्तित्वात येणे आवश्‍यक होते. पण कोरोना आणि ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढे गेली आहे. ही निवडणूक दोन महिने ते सहा महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे १४ मार्च नंतर पुणे महापालिकेवर प्रशासक येणार हे निश्‍चीत झाले आहे. त्यामुळे तत्काळ प्रशासक नेमण्यात यावा असे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडून देण्यात आले आहेत. ही जबाबदारी १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून काम करणार आहेत.

Latest News