पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कामगारांचे पाय धुऊन देशासमोर आदर्श निर्माण केला, मात्र महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा सफाई कामगार महिलांचे शोषण करतात : बाबा कांबळे

पिंपरी / प्रतिनिधी

शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी करण्याचे काम साफ सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. मात्र ठेकेदारी पद्धतीमुळे सफाई कर्मचारी हलाखीचे जीवन जगत आहेत. ठेकेदार सफाई कर्मचाऱ्यांचे शोषण सत्ता धारी भाजपा करत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील दाखवत नाहीत.. महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगार महिलेने होणाऱ्या अन्यायामुळे सफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याला सर्वस्वी आयुक्त व सत्ताधारी जबाबदार असून अशा बेजबाबदार आयुक्तांवर कारवाई करा, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

सफाई कामगार महिलांचे वायसीएम हॉस्पिटल येथे जाऊन बाबा कांबळे यांनी या प्रश्नांची माहिती घेतली व पीडित मेल्यावरती योग्य उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांची भेट घेऊन प्रयत्न केले, यावेळी कष्टकरी कामगार पंचायत महिला आघाडी उपाध्यक्षा मधुराताई डांगे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते

, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 1 हजार 600 पेक्षा अधिक महिला सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. गेल्या चार वर्षापासून विविध ठेकेदाराकडे या महिला काम करत आहेत. नुकताच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ठेकेदार पद्धतीप्रमाणे निविदा काढून नव्याने जुन्याच ठेकेदारांना रस्ते साफसफाईचे काम दिले आले. या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचे व कामगारांचे शोषण होत आहे. त्यांना किमान वेतन दिले जात नाही. तसेच मनमानी पद्धतीने कामावरून काढण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यामुळे विविध ठिकाणी महिलांना कामावरून काढले जात आहे.

या प्रकारामुळे सफाई कर्मचाऱ्यांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. कामावरून काढण्याचा आदेशमुळे अनेकाचे या पूर्वी शाहूनगर भागात कामावरून काढल्यामुळे एक महिला कर्मचारी चक्कर येऊन पडली होती. तर या घटनेमध्ये आणखीन एक भर पडली आहे. ठेकेदाराकडून एका आतापर्यंत संघटनेच्या वतीने 200 पेक्षा अधिक तक्रारी त्यांच्याकडे दिल्या आहेत. परंतु यामध्ये मिळणारा पैसा व कचऱ्यामध्ये पैसे खाण्याची वृत्ती वाढल्यामुळे अशा प्रकारे मागासवर्गीय महीला सफाई कामगारांवर अन्याय सुरू आहे.