तीन भाषेत येणारा बिग बजेट ‘धारावी कट्टा’ चित्रपटाचे पोस्टर व टीझर लॉन्च

IMG-20220303-WA0178

तीन भाषेत येणारा बिग बजेट ‘धारावी कट्टा’ चित्रपटाचे पोस्टर व टीझर लॉन्च

पुणे, प्रतिनिधी :
मुंबई क्रिऐशन इंटरटेनमेंट व ओरीजनल प्राईम पिक्चर 5 प्रस्तुत, निर्माता मिथलेश अग्रवाल, केतन जाधव आणि सफर शेख, प्राईम पिक्चर 5 चैनल क्रिएटीव्ह हेड मयूर कुलकर्णी व लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या धारावी कट्टा या चित्रपटाचे पोस्टर व टीझर लॉन्च करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. चुकीच्या वेळी चुकीच्या जागी अडकलेल्या 4 मुलांचा जीवन संघर्ष धारावी कट्टा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. ‘धारावी कटा’च्या पोस्टरचे उद्घाटन व्हीएनडब्ल्युसी’ ग्रुपच्या चेअरमन बॉबी करनानी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी भाजपचे आमदार महेश लांडगे, साई डेव्हलपर्सचे प्रमुख व भाजपचे अनुसूचित मोर्चाचे उपाध्यक्ष विलास शिंदे, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस नीलम जाधव, फिरोज खान, वरिष्ठ पोलिस अधिकारी बापू कुतवळ, डॉ. मदन कोठुले, आदर्श सरपंच चिदानंद स्वामी, सुभान आली शेख, सॉफ्टवेअर इंजिनिअर समीर शेख, अमजदखान शेख, पौर्णिमा लुनावत, प्रीती भट्टी पाटील, मनोज पिंगळे, ऑलिम्पियन बॉक्सर गोपाल देवांग, आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बापू दुरई, आकाश शिंदे, योगेश लांडगे, विजय घोडके, गणेश साने आदी उपस्थित होते.
लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी त्यांच्या अनोख्या लेखन शैलीतून याआधी चार सुपर हिट चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यापैकी 2018 मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी.एफ या हिंदू मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणार्‍या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला होता. वेडा बी.एफ चित्रपटाची नोंद वल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत.
फिरोज खान यांनी धारावी कट्टा चित्रपटाच्या पोस्टर उद्घाटन सोहळ्यासाठी मोलाचे सहकार्य व योगदान दिल्याबद्दल अल्ताफ दादासाहेब शेख यांनी त्यांचे विशेष आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धारावी कट्टा’ची संपूर्ण टीम व प्राईम पिक्चर 5 च्या संपूर्ण टीमचेही विशेष सहकार्य लाभले..

Latest News