दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे, कोंढवा भागात (NIA) एनआयएची कारवाई

छापेमारी दरम्यान एनआयएनं कागदपत्र आणि डिजिटल साहित्य जप्त केल्याची माहिती आहे. तल्हा खान हा इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहेएनआयएनं हानझीब वानी आणि हिना बशीर बेग या काश्मिरी दाम्पत्याला मार्च 2020 मध्ये अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर आणखी चौघांना अटक केली होती. संशयित तल्हा खान त्यांच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे.इस्लामिक स्टेट खुरासान प्रांतच्या संपर्कात असल्याच्या संशयातून एनआयएनं कोंढवा परिसरातील सोमवारी तल्हा खान उर्फ लियाकत खान या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरी छापेमारी केली आहे.

Latest News