निवडणुकांमध्ये जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रतेने स्वीकारला – काँग्रेस नेते राहुल गांधी

निवडणुकांमध्ये जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रतेने स्वीकारला असून, या निवणुकांमध्ये जनादेश जिंकणाऱ्यांचे अभिनंदन त्यांनी केले आहे. या निवडणुकांमध्ये मी सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार मानतो. या निवडणुकांमधून आम्ही शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या हातात आलेल्या निकालांनुसार भाजप आघाडीवर असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे, तर भाजपचा कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या काँग्रेस पक्षाला पाच राज्यांमध्ये मोठी हार पत्कारावी लागली आहे. यासर्वामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. याबाबत राहुल गांधींनी ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Latest News