पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन, वर्धापनदिन व जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम


पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन आयोजित पिंपरी न्यायालयाचा ३३ वा वर्धापनदिन व जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मंगळवार दि. ०८/०३/२०२२ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री.एस.ए.देशमुख साहेब तसेच पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब हे उपस्थित होते तसेच उपस्थितांमध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे चेअरमन ॲड. वसंतराव साळुंखे, व्हाईस चेअरमन ॲड. राजेंद्रजी उमाप, सदस्य अहमद खान पठाण, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे हे उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितांमध्ये पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती आर. आर. काळे, श्रीमती एस. पी. कुलकर्णी, श्री. आर. एस. वानखेडे, श्री आर. एम.गिरी, श्रीमती पी.सी. फटाले, श्रीमती एन.टी. भोसले हे सर्व न्यायाधीश उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातिर – पाटील हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. सचिन थोपटे यांनी केले. यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्यांचे भाषणात त्यांचे फोनवर येणारे नागरिकांचे तक्रारीमध्ये सर्वात जास्त प्रकरणे कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीतील असल्याचे नमूद करून स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याबद्दल खंत व्यक्त करून समाजातील सर्व घटकांनी स्त्रियांचे सक्षमीकरणासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. त्यानंतर पुणे जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. ए. देशमुख साहेब यांनी त्यांचे खास शैलीत उपस्थित महिला वर्गाला स्वसुरक्षा व त्यासाठी महिलांकडे उपजत असणारे शक्तीस्थळांचा परिचय करुन देऊन त्यांचा वापर संकटसमयी कसा करावा याबाबत अतिशय प्रभावीपणे मार्गदर्शन केले. तसेच पिंपरी न्यायालयाचे विस्तारीकरणा अंतर्गत नेहरूनगर येथील इमारतीत येत्या दोन महिन्यात प्रस्तावित कोर्टांचे कामकाज सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे मा.अध्यक्ष ॲड. संजय दातिर-पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये पिंपरी न्यायालयाचा मागील ३३ वर्षाचे वाटचालीचा आढावा घेऊन पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील वाढत्या लोकसंख्येतून निर्माण होणारे दावे व खटल्यांचा वेळेत निपटारा होणेसाठी आणखी कनिष्ठस्तर, वरिष्ठस्तर, सेशन कोर्ट, औद्योगिक कोर्टांची शहराला गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने पोलिस आयुक्त श्री.कृष्णप्रकाश, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँण्ड गोवाचे नवनिर्वाचित चेअरमन ॲड. वसंतराव साळुंखे, व्हाईस चेअरमन ॲड. राजेंद्रजी उमाप, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. गोरक्षनाथ काळे, पुणे बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, व त्यांची कमिटी तसेच खेड मावळ पिंपरी-चिंचवड नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अँड.अतिश लांडगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महिला वकिलांना गुलाब पुष्प, फेटा बांधून सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन च्या वतीने घेण्यात आलेल्या बॅडमिंटन, रांगोळी, संगीत खुर्ची, कॅरम,बुद्धिबळ,पाककला, स्लो मोटर सायकल, क्रिकेट अशा विविध स्पर्धामध्ये विजेत्या वकिलांचा सत्काराचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पिंपरी चिंचवड ॲड बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष अँड.सुभाष चिंचवडे,अँड.उत्तम चिखले,अँड. अशोक भटेवरा,अँड. अविनाश गोलांडे,अँड.सत्यनारायण चांडक,अँड.देवराम ढाळे,अँड.सुनील होनराव,अँड. मदनलाल छाजेड,अँड.राजू माधवन,अँड.सुशिल मंचरकर,अँड.सतीश गोरडे,अँड.विजय शिंदे,अँड.अनिलकुमार तेजवानी,अँड.विलास कुटे,अँड. सुहास पडवळ,अँड.महेश नागरगोजे,अँड.अशोकपाल शर्मा,अँड.सुदाम साने,अँड.किरण पवार,अँड.राजेश पुणेकर,अँड.सुनील कडूसकर,अँड.दिनकर बारणे, अँड.गोरक्षनाथ झोळ यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. गोरक्ष लोखंडे व पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे सचिव ॲड.निखिल बोडके यांनी केले. तसेच आभार पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी मानले. कार्यक्रमाकरिता पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनची कार्यकारणी व असंख्य वकील कुटुंबासमवेत उपस्थित होते.