PCMC: क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करणार :राजेश पाटील

????????????????????????????????????

पिंपरी चिंचवड : परिवर्तनाचा सामना : महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाकडील आदेशान्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी व विशेषत: कलम ४५२अ च्या १ (अ) व (ब) मधील तरतुदीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासक पदी निम्नस्वाक्षरीकार यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच महानगरपालिकेची विहीत मुदत संपताच प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारून अधिनियमातील तरतूदीनुसार आवश्यक कार्यवाही करणेबाबत निर्देशित केले आहे. तसेच, नगरसदस्य यांची मुदत संपल्याने क्षेत्रीय स्तरावर मुख्य समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली

आहे. यामध्ये, अ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता श्रीकांत सवणे (बी.आर.टी.एस), ब क्षेत्रिय कार्यालय – बांधकाम परवानगी सह शहर अभियंता मकरंद निकम, क क्षेत्रिय कार्यालय – भूमि आणि जिंदगी सहायक आयुक्त प्रशांत जोशी, ड क्षेत्रिय कार्यालय – नागरवस्ती उपआयुक्त अजय चारठणकर, इ क्षेत्रिय कार्यालय – सह शहर अभियंता सतीश इंगळे, फ क्षेत्रिय कार्यालय – प्र.अतिरिक्त आयुक्त (३) उल्हास जगताप, ग क्षेत्रिय कार्यालय – उप आयुक्त तथा प्र. कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, ह क्षेत्रिय कार्यालय – पर्यावरण विभाग सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विद्यमान मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली आहे.

शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटणे गरजेचे आहे. त्यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकारी म्हणून अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली

सर्व मुख्य समन्वय अधिका-यांनी दर सोमवारी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपस्थित राहून जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवावे, असे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकारी व सर्व विभागांचे विभागस्तरावरील अधिकारी सदर सभेस उपस्थित राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.

Latest News