रशियाला हल्ले थांबवण्याचे आदेश – आंतरराष्ट्रीय कोर्ट

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाविरुद्धच्या खटल्यात युक्रेनने पूर्ण विजय मिळवलाय. ICJ ने ताबडतोब आक्रमण थांबवण्याचे आदेश दिलेत. हा आदेश आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बंधनकारक आहे. रशियाने त्वरित त्याचे पालन करायला हवे. आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास रशिया आणखी एकाकी पडेलया खटल्याच्या ४ मार्च रोजी झालेल्या प्राथमिक सुनावणीला रशियाची उपस्थित नव्हती. तसेच बुधवारी न्यायालयाने (UN international court) दिलेला निर्णय ऐकण्यासाठी त्याचे वकीलही हजर नव्हते. त्याऐवजी त्यांनी न्यायालयाला पत्र पाठवून दावा केला आहे की ICJ कडे या प्रकरणी अधिकार नाही, कारण रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना लिहिलेल्या पत्रात नरसंहाराच्या नव्हे तर स्वसंरक्षणाच्या आधारावर हल्ल्याचे औपचारिक समर्थन केले होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाला युक्रेनवरील आक्रमण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. युक्रेनवर रशियन आक्रमण सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पहिल्यांदाच हा निर्णय दिला आहे. युक्रेनने २७ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. त्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ( (ICJ) रशियाला युक्रेनमधील लष्करी कारवाई ‘तत्काळ स्थगित’ करण्याचे आदेश दिलेत. न्यायालयाने १३ विरुद्ध दोन मतांनी हा निर्णय दिलाय. न्यायालयातील केवळ रशियन आणि चिनी न्यायमूर्तींनी या आदेशाच्या विरोधात मतदान केले. दरम्यान, रशियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या युक्रेनचे ICJ ने कौतुक केले आहे.रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) २१ व्या दिवशी रशियाने खारकीव्ह येथे केलेल्या गोळीबारात ५०० नागरिक मारले गेल्याचे वृत्त आहे. शहरातील इमर्जन्सी सर्व्हिसेस एजन्सीने ही आकडेवारी दिली आहे. दरम्यान, रशियाला प्रतिकार करण्यासाठी युक्रेनला ८०० मिलियन डॉलरची (६२०४ कोटी रुपये) लष्करी मदत अमेरिका देणार आहे, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली आहे.